शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नौदल अधिकाऱ्याला दिलासा नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 4:18 AM

मुलगा आॅटिस्टिक असल्याने, त्याची काळजी घेण्यासाठी मुंबईतच राहण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत, एका नौदल अधिकाऱ्याने

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलगा आॅटिस्टिक असल्याने, त्याची काळजी घेण्यासाठी मुंबईतच राहण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत, एका नौदल अधिकाऱ्याने त्याच्या बदलीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सुट्टीकालीन न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्याला दिलासा देण्यास नकार दिला.नौदलाने अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना आणखी एक वर्ष मुंबईत राहण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र, घर खाली करून द्यावे लागेल, असेही नौदलाने स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्याला नौदलाने दिलेली सवलत लक्षात घेत, न्या. बी.पी. कुलाबावाला आणि न्या. ए. एम. बदार यांच्या खंडपीठाने कॅप्टन विक्रम सिंह यांना दिलासा देण्यास नकार दिला.कॅप्टन विक्रम सिंह यांची मुंबईहून विशाखापट्टणमला करण्यात आली आहे. या बदलीला सिंह यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सिंह यांनी केलेल्या याचिकेनुसार, त्यांचा मुलगा आॅटिस्टिक असून, सध्या तो बारावीत शिकत आहे, तसेच त्याची विशेष वैद्यकीय काळजी घेणे आवश्यक आहे. त्यावर नौदलाचे वकील नील हेळेकर यांनी नौदलाने अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना, जुलै २०१८ पर्यंत मुंबईत नौदलाने दिलेल्या घरातच राहण्याची परवानगी दिली असल्याचे खंडपीठाला सांगितले. मात्र, वकिलांनी हे तोंडीच सांगितल्याने, उच्च न्यायालयाने हे आश्वासन प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश नौदलाला दिले. पुढील सुनावणी ८ जूनला‘बदलीला अंतरिम स्थगिती देण्याची आवश्यकता नाही. नौदलाने या प्रकरणाची योग्य प्रकारे दखल घेतली आहे,’ असे म्हणत, खंडपीठाने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ जून रोजी ठेवली आहे.