ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. 25 - नवी मुंबईच्या खांदेश्वरमध्ये पोलिसांनी 35 लाखांच्या नव्या नोटा आणि 2 किलोची सोन्याची बिस्किटं ताब्यात घेतली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा या नव्या 2000 च्या आहेत. तसंच जप्त करण्यात आलेलं 2 किलो 50 ग्राम सोनं नेमकं कुणाचं आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.
याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. या सहा जणांपैकी 4जण हे पुण्यातील अाहेत तर दोनजण ऐरोली आणि वाशीतील आहेत.दरम्यान, अटक करण्यात आलेले 6 जण नोटा बदलण्यासाठी आले होते का? तसंच कोणत्या व्यापाऱ्याला सोनं देण्यास आले होते याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली आहे.