शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

नवी मुंबईकरांनी केला स्वच्छ शहराचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2016 2:55 AM

गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

नवी मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी स्वच्छ आणि हागणदारीमुक्त शहराचा निर्धार करण्यात आला. नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छ, सुंदर व हागणदारीमुक्त शहराबाबत जनजागृती केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी आंबेडकरनगर, राबाडे येथील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांनी कमीत कमी कचरा निर्माण करून उघड्यावर कचरा टाकणार नाही अशी सवय लावून घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर अविनाश लाड यांनीही वाशी येथील मिनी सी शोअर परिसरातील मोहिमेप्रसंगी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे व शहर स्वच्छतेत संपूर्ण योगदान देण्याचे आवाहन नागरिकांना केले. बेलापूर विभागात किल्ले गावठाण, गोवर्धनी माता मंदिर परिसर, नेरु ळ विभागात सेक्टर ३, बस डेपो, वाशी विभागात मिनी सी शोअर परिसर, तुर्भे विभागात ए.पी.एम.सी. मार्केट सेक्टर १९ परिसर, घणसोली विभागात मुंब्रादेवी निब्बाण टेकडी परिसर, त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागात कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसर, ऐरोली विभागात सेक्टर ३ बसडेपो, ऐरोली रेल्वे स्टेशन आणि भाजी मार्केट याठिकाणी व दिघा विभागात हिंदमाता शाळेजवळ, विष्णुनगर बौध्द शाखेजवळ, मुकुंद कंपनी गेटजवळ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील सर्वच विभागात स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच शहर स्वच्छ राखण्याचा निर्धार करण्यात आला.या मोहिमेला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, परिमंडळ १ चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ चे उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपआयुक्त रिता मैत्रेवार यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)>सीबीडीतील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सेक्टर ८ए व बी यांच्या वतीने तसेच स्वीकृत नगरसेवक साबू डॅनियल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बॉम्बे कॅथलिक सभेच्या वतीने वाशी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. वाशीतील फादर एग्नेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभागी होवून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प केला. >नेरूळ येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गांधीजींची आवडती भजने सादर केली. गांधीजींची शिकवण, त्यांचे विचार याबाबत शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.