खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना शरद पवारांनीअमरावतीमध्ये एक चूक झाली होती, त्यासाठी मी तुमची माफी मागतो, असे म्हटले होते. यावरून आमदार रवी राणा यांनी शरद पवारांच्या या टीकेवर प्रत्यूत्तर दिले आहे.
2019 मध्ये शरद पवार यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना मिळाला होता. नवनीत राणा यांना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच खासदार बनण्याची संधी मिळाली आहे. नवनीत राणा जेव्हा भाजपामध्ये गेल्या, तेव्हा त्यांनी शरद पवारांना सांगितले होते. पवारांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत, असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला.
याचबरोबर ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांची सुद्धा इच्छा होती. म्हणून अजित पवार यांना त्यांनी भाजपसोबत पाठवले. अचानक सुप्रिया सुळे यांच्या हट्टापाई त्यांना थांबावे लागले, अशी टीकाही राणा यांनी केली.
शरद पवार यांच्या मनात भाजप आहे, फक्त ओठावर विरोध आहे. त्यांचा मनामधल्या भाजपमध्ये नवनीत राणा आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे शरद पवार बोलले असतील, असा टोलाही राणआ यांनी लगावला.