तिसरी माळमहाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी रेणुकादेवी माहूर हे एक पूर्ण पीठ आहे. प्रतिवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. गतवर्षी कोरोनामुळे नवरात्र यात्रा रद्द करण्यात आली होती.
यादवकालीन राजाने बांधले मंदिरएक महान धार्मिक स्थळ व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते. रेणुका देवीचे मंदिर शहरापासून सुमारे २.४१५ किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या यादवाचा राजा यांनी देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले होते. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुकादेवीच्या सन्मानार्थ येथे मोठी यात्रा भरते. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.
रेणुका मातेचा शारदीय महोत्सवनवरात्रात दरवर्षी माहूर गडावर शारदीय महोत्सव साजरा होतो. परंतु गतवर्षी कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच महोत्सव पार पडला नाही. परंतु यंदा शासनाने नियमात बदल करुन लसीकरण बंधनकारक करीत १६ हजार भाविकांना दररोज दर्शनाची सोय केली. यात ऑनलाईन १२ हजार व ऑफलाईन ४ हजार भाविकांचा समावेश आहे. दीड वर्षानंतर मंदिर प्रशासनाने सुरू होत असल्याने प्रशासनाने चांगलीच तयारी केली होती. नवरात्रोत्सव काळात सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येणार असून वेळेत बदल करण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाने राखून ठेवला आहे, असे सांगण्यात आले.
कोरोना काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेत प्रशासन कामाला लागले आहे. सर्वच विभागाचे प्रमुख व कर्मचारी भाविकांना सुलभ दर्शन मिळावे व कोविड नियमांचे पालन व्हावे म्हणून प्रयत्नशील आहेत. - राकेश गिड्डे, कोषाध्यक्ष, विश्वस्त समिती तथा तहसीलदार, माहूर