पुणे : खिचडी, वरईची भगर, थालीपिठ, साबुदाणा वडा आवडत नसेल तर उपवासाचा डोसा आणि काकडीची भाजी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन पर्याय असू शकतो. जाणून घ्या ही सोपी, सुटसुटीत रेसिपी.
उपवासाचा डोसा
साहित्य :
पाच तास भिजवलेला साबुदाणा १ वाटी
पाच तास भिजवलेली भगर किंवा वरई ३ वाटी
मीठ
लोणी किंवा तूप
कृती :
वेगवेगळे भिजवलेले साबुदाणा आणि भगर बारीक वाटून पातेल्यात एकत्र करावेत.
त्यात डोसा होईल इतके पाणी आणि मीठ घालून एकजीव करावे.
नॉनस्टिक तव्यावर लोणी किंवा तूप लावून डोसा घालावा. एकाबाजूने भाजल्यावर डोसा आपोआप सुटू लागतो.
डोसा दुसऱ्या बाजूने भाजण्याची गरज नाही.हा डोसा गरमच खावा.
(डोसा कडक वाटत असेल तर याच पिठात कमी पाणी घालून एक चमचा शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा मिरचीचा ठेचा घालून उतप्पेही करता येतात)
काकडीची भाजी
साहित्य
मोठ्या काकड्या दोन
दाण्याचा कूट
लाल तिखट
मीठ
जिरे
कोथिंबीर
तूप किंवा तेल आवडीनुसार
कृती
काकडीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. शक्यतो साल काढू नये.
तेलात जिरे तडतडून घ्यावेत.
त्यात काकडी, लाल तिखट घालून एकजीव करा.
त्यात वाटीभर पाणी घालून भाजी शिजू द्या
पाण्याला उकळी आल्यावर त्यात दाण्याचा कूट, कोथिंबीर आणि मीठ घाला.
भाजी पूर्ण कोरडी करू नका.
ही भाजी नुसतीही लिंबू पिळून छान लागते.