शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

नौदल, तटरक्षक दल सज्ज

By admin | Published: June 11, 2016 2:11 AM

नालेसफाईच्या कामाबाबत साशंकताच व्यक्त होत असल्याने यंदा मुंबईत पाणी भरणार नाही

मुंबई : नालेसफाईच्या कामाबाबत साशंकताच व्यक्त होत असल्याने यंदा मुंबईत पाणी भरणार नाही, याची शाश्वती महापालिकेलाही देता आलेली नाही़ त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाबरोबरच पहिल्यांदाच आर्मीच्या सहा तुकड्याही तैनात ठेवण्यात येणार आहेत़ मान्सून लवकरच मुंबईत दाखल होण्याचे संकेत आहेत़ त्यामुळे मान्सूनपूर्व कामांची रंगीत तालीम घेण्यात येत आहे़ पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यास मदतकार्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय़ ए़ कुंदन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पाण्याचा निचरा त्वरित होण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत आठ ठिकाणी पम्पिंग स्टेशन, नाल्यांचे रुंदीकरण, पर्जन्य वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली़ तरीही ताशी केवळ ५० मि़मी़ पावसाच्या पाण्याचा निचरा होत आहे़ मात्र मुसळधार पाऊस आणि समुद्रात ४़३ मीटरहून उंच लाटा उसळल्यास मुंबई जलमय होत असल्याचे चित्र कायम आहे़ (प्रतिनिधी)>पाणी तुंबण्याच्या ठिकाणांवर वॉच२३८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाणी भरणाऱ्या ठिकाणांवर नजर ठेवून आवश्यकतेनुसार मदत पुरविणे व पाण्याचा निचरा केला जाणार आहे़ तसेच २४ विभागीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत़ या कक्षाला प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळ देण्यात आले आहे़ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकगेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक बोलाविण्यात येत होते़ या वर्षीपासून हे पथक मुंबईतच तैनात करण्यात आले आहे़ त्याचबरोबर पायदळ, नौदल, भारतीय तटरक्षक दल यांच्याही तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत़धोकादायक वृक्षांवर नजरमुंबईत ५४ हजार ९४२ वृक्ष धोकादायक आहेत़ यापैकी ३३ हजार वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात आल्या आहेत़ मात्र पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचा धोका असल्याने वृक्ष अवेक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असणार आहे़तटरक्षक दल़... चार पथके तैनात, प्रत्येक पथकात चार सदस्य, कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे ही पथके तैनात, या पथकांकडे तरंगते तराफे, लाइफ जॅकेट्स, प्रथमोपचार संच आहेत़ नि:शुल्क हेल्पलाइन क्ऱ १९५४ तसेच पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडली आहेत.>पालिकेच्या पाच शाळांमध्ये तात्पुरते निवारेपर्जन्य जलवाहिन्यांच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी २९३ ठिकाणी पंपआकस्मिक खर्चाकरिता एक लाख रुपये प्रत्येक विभागासाठी उपलब्ध पुरातून नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी २० जीवरक्षक तराफे