शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नवाब मलिक पुन्हा ठरले खोटे; वनविभागाच्या खुलाशाने खोटेपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2016 12:49 AM

रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मुंबई : रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या आधीही विविध खात्यांवर केलेले आरोप मलिक सिद्ध करू शकले नव्हते.केवळ सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी लाटण्याचा त्यांचा स्वभाव बनल्याचा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राज्यामध्ये वनक्षेत्राच्या जवळपास १५,५०० गावे असून, त्यात आदिवासींची संख्या अधिक आहे. लोकसहभागातून वन व वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. या समित्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या कलाकुसर असलेल्या वस्तू, औषधी वनस्पती आणि गौण वनउत्पादनांना बाजारपेठ नसल्याने, त्यांना योग्य भाव मिळत नाही. आदिवासींचे जीवनमान उंचावणे आणि त्यांची सामाजिक, तसेच आर्थिक उन्नती साधने हा शासनाचा हेतू होता. अशा वनव्यवस्थापन समित्यांनी आपली उत्पादने कोणाला द्यायची, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना प्रशिक्षण व अन्य बाबींसंदर्भात सहाय्यभूत भूमिका बजाविण्याचे वनविभागाने ठरविले. त्यातून रामदेवबाबांची भेट घेतली गेली, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून रामदेव यांची भेट होती. मात्र, पतंजली समूहाबरोबर वनौषधी व इतर वनउत्पादनांची विक्री करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. रामदेव यांच्या कंपनीला औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी जमीन देण्याची बातमीही पूर्णत: निराधार आहे. वनजमीन कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तींना देण्यासंदर्भात केंद्रीय वनसंवर्धन कायदा अत्यंत कडक आहे. गरीब, कष्टकरी आदिवासींना उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार असे प्रयत्न करत असताना, मलिक यांनी आरोप करून गोरगरिबांच्या हक्कांच्या आड येऊ नये, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला आहे.