Nawab Malik : दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान, नवाब मलिकांचा आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 03:34 PM2021-11-02T15:34:00+5:302021-11-02T15:34:45+5:30

Nawab Malik : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Nawab Malik: Conspiracy to get Ajit Pawar's name by confiscating another's property, Nawab Malik accused of Income Tax department's action | Nawab Malik : दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान, नवाब मलिकांचा आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप

Nawab Malik : दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांचे नाव गोवण्याचे कारस्थान, नवाब मलिकांचा आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप

Next

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नाला राज्य सरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले. 

भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोष मुक्त केले. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे, यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला. 
 
याचबरोबर, जो खेळ बंगालमध्ये सुरु होता, तोच खेळ आता महाराष्ट्रात केला जात आहे. निवडणुकीच्या आधीही हा बदनामीचा खेळ सुरु होता. भाजपने नेत्यांवर दबाव टाकून पक्ष सोडण्यावर भाग पाडले. अनेक लोक भाजपमध्ये तेव्हा गेले, ते आता सांगतात की, आम्हाला आता शांत झोप लागते. यावरुनच संस्थांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. मात्र राज्य सरकार किंवा यातील एकही नेता अशा कारवाईंना घाबरणार नाही. अन्याय होतो आहे त्यावर लढा देऊ, असेही नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.

Web Title: Nawab Malik: Conspiracy to get Ajit Pawar's name by confiscating another's property, Nawab Malik accused of Income Tax department's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.