सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. परंतु राज्य सरकारनं लसीकरणाच्या नोंदणीसाठी स्वत:चं अॅप तयार करू देण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खोचक टोला लगावत एक मागणी केली आहे. "केंद्र सरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू. पण आम्ही आश्वासन देतो की, सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल. परंतु आम्हाला स्वतंत्र अॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे."कोविन अॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अॅप वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारला हे अॅप तयार करण्याची परवानगी द्यावी," अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्र सरकारने ही परवानगी दिली तर या अॅप आणि इतर माध्यमातून लोकांच्या नोंदी घेऊन लस देण्यात सुलभता येईल. परंतु केंद्र सरकारने अजूनही परवानगी दिलेली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पंतप्रधानांना विनंतीकेंद्र सरकारच्या लसीकरण अॅपमध्ये त्रुटी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लसीकरण नोंदणीसाठी वेगळं अॅप द्यावं अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. सध्याच्या अॅपमुळे लसीकरणाची नोंदणी करताना लसीकरणाचा स्लॉट तासनतास प्रयत्न करून मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आज कोणत्याही केंद्रात जाऊन नागरिक लस घेत असल्याने असून स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकराने लसीकरण नोंदणीसाठी वेगळं अॅप लवकर द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी केंद्र सरकारला केली.
"सर्टिफिकेटवरील फोटो हटवणार नाही, परंतु आम्हाला स्वतंत्र अॅप तयार करण्याची, नियंत्रणाची जबाबदारी द्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 5:48 PM
Corona Vaccination App : यापूर्वी नवं अॅप तयार करण्यासाठी परवानगी देण्याची पंतप्रधानांकडे करण्यात आली होती विनंती.
ठळक मुद्देयापूर्वी नवं अॅप तयार करण्यासाठी परवानगी देण्याची पंतप्रधानांकडे करण्यात आली होती विनंती.सध्याच्या अॅपवर नागरिकांना समस्या जाणवत असल्यानं नवं अॅप तयार करण्यासाठी नवाब मलिकांची विनंती