माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यावरून आता राजकारण तापू लागलं आहे. यावरून आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा दाखल करु शकते. परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापद्धतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे यावरुन हे राजकारणच सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे."मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊन अहवाल सादर करायला सांगितले होते. परंतु ज्यापद्धतीने सीबीआयने धाडसत्र सुरू केले आहे. त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयासमोर सीबीआयने प्राथमिक अहवाल ठेवला का? न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही किंवा आमच्याकडे उपलब्ध नाही," असे नवाब मलिक म्हणाले. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही"कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. अनिल देशमुख यांनी सुरूवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होते. याबाबतचा NIA ने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे," असेही नवाब मलिक म्हणाले.
Anil Deshmukh CBI: "पहिल्यापासून ज्याप्रकारे प्रकरण तयार केलं, त्यावरुन राजकारण सुरू असल्याचं दिसतंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 3:34 PM
सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय; जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर लवकरच उघड होईल : नवाब मलिक
ठळक मुद्देसत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय; नबाव मलिक यांचा आरोपराजकारण सुरू आहे ते जनतेसमोर लवकरच उघड होईल : नवाब मलिक