मुंबई: क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून सुरू झालेलं नवाब मलिक (Nawab Malik) विरुद्ध मुंबई एनसीबी (NCB) युद्ध अजून संपलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनेकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) टीका केली आहे. आज मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे. तसेच, एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्यातल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील पत्रकार परिषदेत ऐकवली.
'एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार'नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर निशाणा साधला. यावेळी मलिक म्हणाले, एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही सुरुच आहे. 2021 मध्ये NCB ने खोटे आरोप दाखल केले जात होते, मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात होते. क्रुझवरील रेडनंतर अनेक प्रकरणं पुढे आली. एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. मागील तारखांच्या पंचनाम्यावर सही केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
'बॅक डेटवर सही केली जात आहे'मलिक म्हणाले, 2 ऑक्टोबर 2021 क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा सुरू आहे. मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे. यावेळी, कथित संभाषणाची क्लिप ऐकवत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा सवालही नवाब मलिकांनी विचारला आहे.
'मी सगळ्यांची पोलखोल करणार'यावेळी मलिक यांनी एनसीबीकडून समीर वानखेडे याच्या जामिनाविरोधात अपील करण्यात आल्याचा आक्षेप घेतला. मुख्य आरोपी करन सजनानी आहे. 6 आरोपी आहेत, मग फक्त समीर खानच्याच विरोधात अपील का केली गेली? करण सजनानीच्या घरुन हा माल पकडला गेला. गांजा म्हटले, पण तंबाखू होती. राहिला फर्नीचरवालाच्या विरोधात अपील केली नाही. फक्त समीर खानच्या विरोधात अपील करून प्रसिद्धीचा खेळ सुरू केला गेला. हे सगळं मला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं जातंय. तुम्ही ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम केलं. आमच्या घरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मी कुणालाही घाबरणार नाही, मी सगळ्यांची पोलखोल करणार, असंही नवाब मलिकांनी म्हटलं.