शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

ईडीनं अटक केलेल्या मंत्री नवाब मलिकांची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 8:19 PM

नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती किती याची माहिती पुढीलप्रमाणे...

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज सक्तवसुली संचालनानयानं (ईडी) अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्याद गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबतची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियातही वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. नवाब मलिक यांच्या संपत्तीबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती किती याची माहिती पुढीलप्रमाणे...

नवाब मलिकांनी एकूण संपत्ती किती?-  मंत्री नवाब मलिक यांनी २०१९ मध्ये निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४ लाख ५४ हजार रुपये रोख आहेत असं म्हटलं होतं. तसंच त्यांच्या पत्नीकडे ९७,२३२ रुपये रोख आहेत. बँकेतील जमा रकमेबाबत बोलायचं झालं तर नवाब मलिक यांचा बँक बॅलन्स सुमारे ५ लाख ३ हजार रुपये आहे. तर पत्नीच्या खात्यात १ लाख ९२ हजार रुपये असल्याचं म्हटलं होतं. 

- नवाब मलिक यांच्याकडे 35,231 रुपयांचे गुंतवणूक रोखे आणि पत्नीच्या नावे 1 कोटी 13 लाख रुपयांचे रोखे आहेत. याशिवाय ५ लाखांची एलआयसी आहे.

- नवाब मलिक यांच्यावर 15,16,233 रुपये कर्ज असून त्यांच्याकडे 7 लाख रुपयांची वाहने आणि पत्नीकडे 4 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे 32 लाख 43 हजार रुपयांची संपत्ती आहे. अशा स्थितीत नवाब मलिक यांच्याकडे 37 लाख 7 हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 53 लाख रुपयांची संपत्ती आहे.

- घर, जमीन इत्यादीबद्दल बोलायचे झाले तर नवाब मलिक यांच्याकडे 1 कोटी 14 लाख रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 2 कोटी 70 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

- नवाब मलिक यांच्यावर 19 लाख 49 हजार रुपये तर त्यांच्या पत्नीवर 25 लाख 81 हजार रुपयांचे कर्ज आहे.

कमाई किती?

प्रतिज्ञापत्रानुसार, 2018-19 मध्ये त्यांनी 10 लाख 90 हजार रुपये कमावले होते. यापूर्वी 2017-18 मध्ये 11 लाख 83 हजार, 2016-17 मध्ये 2 लाख 13 हजार, 2015-16 मध्ये 6 लाख 14 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

ईडीच्या आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयातून बाहेर येताच मोठ्या संख्येने जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'झुंगे नही झुंगे नही'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती. नवाब मलिक यांनीही झुकणार नाही, लढणार आणि जिंकणारच, असा इशारा देत हात हलवत कार्यकर्त्यांना इशारा केला. सध्या नवाब मलिक यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस