महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 04:35 PM2019-11-14T16:35:30+5:302019-11-14T16:35:30+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेले भाजप-शिवसेना पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे वेगवेगळे झाले. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाशिवआघाडीचे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र या महाशिवआघाडीत मुख्यमंत्री कुणाचा असणार अशी चर्चा सुरु असतानाच, मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असून आम्हाला कसलीच अडचण नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहेत. तिन्ही पक्षाच्या बैठकांवर-बैठका सुरु आहेत. तर लवकरच या तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात, असे बोलले जात आहे.
तर ज्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपचे साथ सोडली, ते त्यांना महाशिवआघाडत मिळणार का याबाबतीत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. मात्र याविषयाचा खुलासा करताना नवाब मलीक म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठीच शिवसेना युतीतून बाहेर पडली आहे. त्यांच्या स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देणे ही आमची जवाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे मलीक म्हणाले.
मात्र उपमुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसतर सत्तेत येण्यास तयारच नाही, ते बाहेरून समर्थन देण्याच्या विचारत आहे. परंतु त्यांनी सत्तेत असावे ही आमची इच्छा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात पदावरून कोणतेही वाद होणार नाहीत. तसेच आम्ही बसवून यावर निर्णय घेऊ असेही मलीक म्हणाले.