शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

भाजपवरील खोट्या आरोपांबाद्दल नवाब मलिक यांनी जनतेची माफी मागावी; प्रसाद लाड यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 7:33 PM

भाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाड

ठळक मुद्देभाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाडरेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यानं जनतेला त्रास, लाड यांचं वक्तव्य

"दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील 'रेमडेसिवीर'चा साठा भारतीय जनता पार्टीचे नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केल्याने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा खोटेपणा उघड झाला आहे. या खोटेपणाबद्दल मलिक यांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांनी खोटे आरोप करणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी केली. रेमडेसिवीर औषधांच्या साठेबाजीची सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणीही लाड यांनी यावेळी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   "भाजपकडून जो ५० हजार रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा राज्य सरकारच्या मार्फतच केला जाणार होता असे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री शिंगणे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. नवाब मलिक यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकार व भाजपाच्या नेत्यांविरूद्ध जे आरोप केले, ज्या अफवा पसरवल्या त्याबद्दल त्यांनी माफी मागावी," असं लाड यावेळी म्हणाले.

अशोक चव्हाणांच्या मागणीला पाठिंबा  राज्यामध्ये रेमडेसिवीर औषधांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाला आहे. राज्य सरकारला हा काळाबाजार रोखता आला नसल्याने  जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे या औषधाच्या साठेबाजीची  व काळ्याबाजारातील विक्रीची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचंही लाड यांनी नमूद केलं. "राज्य सरकारच्या विविध यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा स्तरावरील यंत्रणांना रेमडिसीवरचा काळाबाजार रोखता आलेला नाही. आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी  एनआयए अथवा सीबीआय मार्फत  या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांच्या या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे. अशी चौकशी झाल्यास या प्रकरणातले सत्य बाहेर येईल," असं त्यांनी नमूद केलं.भाजप राज्य सरकारमार्फतच मदत करणार"भारतीय जनता पक्षानं  संकटाच्या काळात नेहमी जनतेच्या कल्याणाचा विचार केला. भाजपाकडून औषधांची जी मदत केली जाणार आहे ती राज्य सरकारच्या मार्फतच केली जाणार आहे. परस्पर नाही.  राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या औषधांचा पुरवठा केला. स्थानिक पातळीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींकडून परस्पर औषधांचा पुरवठा केला आहे. मग हा औषधांचा साठा कुठून आला? या लोकप्रतिनिधींना औषधे पुरवण्याची परवानगी कोणी दिली?," असा सवालही लाड यांनी केला.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPrasad Ladप्रसाद लाडnawab malikनवाब मलिकBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीSharad Pawarशरद पवार