Nawab Malik: नवाब मलिकांना दणका! उच्च न्यायालाने 15 मार्चपर्यंत निकाल राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 02:04 PM2022-03-11T14:04:18+5:302022-03-11T14:10:38+5:30

Nawab Malik: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे

Nawab Malik:Bombay High Court reserves Maharashtra Minister Nawab Malik's plea over his arrest by ED for March 15 | Nawab Malik: नवाब मलिकांना दणका! उच्च न्यायालाने 15 मार्चपर्यंत निकाल राखून ठेवला

Nawab Malik: नवाब मलिकांना दणका! उच्च न्यायालाने 15 मार्चपर्यंत निकाल राखून ठेवला

googlenewsNext

मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेनवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेबाबतची याचिका 15 मार्चपर्यंत राखून ठेवली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर मंगळवारी निर्णय होणार आहे.

नवाब मलिक यांनी ईडीच्या (ED) कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली, यात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. दरम्यान, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा नवाब मलिक यांचे वकिल अॅड अमित देसाई यांनी केला. तर अटक कायदेशीर असल्याचा युक्तिवाद ईडीकरुन करण्यात आला.

काय आहे प्रकरण?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. 15 मार्चपर्यंत मलिक यांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणावर येत्या 15 मार्चला निर्णय होणार आहे.

Web Title: Nawab Malik:Bombay High Court reserves Maharashtra Minister Nawab Malik's plea over his arrest by ED for March 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.