शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नक्षल उपकमांडर महिलेचे गडचिरोलीत आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 5:02 PM

तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. 

 गडचिरोली - तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. 

महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे तिला विविध प्रकारचा लाभ दिला जाणार आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याच्या भोपालपट्टनम येथील मूळची रहिवासी असलेली ज्योती नोव्हेंबर २००९ मध्ये नक्षल्यांच्या भोपालपट्टनम दलममध्ये भरती झाली होती. तेव्हापासून अनेक नक्षली कारवायांत तिचा सक्रिय सहभाग होता. तेलंगणा भागात कार्यरत मंगी दलममध्ये ती आतापर्यंत उपकमांडर म्हणून कार्यरत होती.  मात्र महाराष्टÑ शासनाने नक्षल चळवळीपासून दूर होणाºयांना पुढील जीवन चांगले जगता यावे यासाठी आत्मसमर्पण योजनेतून विविध प्रकारचे लाभ देणे सुरू केल्याने नक्षल नेते व चळवळीचे सदस्य पोलिसांना शरण येत आहेत. भूखंड, आर्थिक मदत, रोजगार, नसबंदी पुन्हा उघडणे यासारख्या माध्यमातून आत्मसमर्पितांचे पुनर्वसन घडवून आणल्या जात  असल्याने सन २०१८ च्या चार महिन्यात ९ माओवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले आहे. इतरांनीही हिंसक मार्ग सोडून मूळ प्रवाहात परत यावे व आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले आहे.

मोठ्या नेत्यांवर लाखोंची बक्षीसेसध्या गडचिरोली पोलिसांना लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या नक्षल्यांच्या पाच मोठ्या नेत्यांचा शोध घ्यायचा आहे. त्यात मलोजुला रेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू उर्फ विवेक उर्फ लक्ष्मीनारायण उर्फ लच्छन्ना अभय याच्यावर ६० लाख रुपयांचे, दीपक उर्फ मिलिंद उर्फ प्रवीण उर्फ अरुण उर्फ सुधीर उर्फ सह्याद्री तेलतुंबडे याच्यावर ५० लाखांचे, नर्मदाक्का उर्फ अल्लुरी उषारानी किरणकुमार हिच्यावर २५ लाखांचे, याशिवाय जोगन्ना उर्फ घिसु ऊर्फ चिमाला नरसय्या याच्यावर २० लाखांचे तर पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान उर्फ कुमारसाय कतलामी उर्फ बाबुराव तोफा याच्यावर १६  लाख रुपयांचे बक्षीस आहे. गुप्त माहितीच्या आधारे त्यांना अटक झाली किंवा ते जीवानिशी मारले गेले तर त्यांच्यावर घोषित बक्षीस माहिती देणाºयास दिले जाईल व नावही गुप्त ठेवले जाईल, असे जाहीर आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस