नसबंदीसाठी दबाव : युवक-युवतींमध्ये प्रचंड असंतोषगडचिरोली : नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते. मात्र नक्षल चळवळीतून त्याला प्रखर विरोध होता. नसबंदीसाठी आमच्यावर दबाव आणला जात होता. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे सुखी जीवन जगण्यासाठी आत्मसर्मपणाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय दिसत नव्हता. शेवटी आत्मसर्मपण करायचे ठरविले आणि अखेर अपत्य प्राप्तीसाठी आम्ही दोघांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले, अशी माहिती आत्मसर्मपण करणार्या नक्षली दाम्पत्याने पोलिसांना दिली. संदीप ऊर्फ महेंद्र केरामे (२६) रा. खुनेरा, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) आणि शीला ऊर्फ लता गोटा (२0) रा. कोरची, जि. गडचिरोली असे या आत्मसर्मपित नक्षल दाम्पत्याचे नाव आहे. नुकतेच त्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले. अकरावीपयर्ंत शिक्षण घेतलेल्या संदीपला नक्षल्यांनी बळजबरीने दलममध्ये सहभागी केले. तर शीला प्लाटून ५६ ची सदस्य होती. उत्तर गडचिरोली-गोंदिया डिव्हिजनचा डिव्हिजनल कमांडर पहाडसिंगचा अंगरक्षक असलेल्या संदीपने शीलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. शीलानेही होकार दिला. मात्र चळवळीतील नक्षल्यांचा लग्नाला प्रखर विरोध होता. अखेर सहकार्यांचा विरोध झुगारुन खुद्द पहाडसिंगने जानेवारी २0१४ मध्ये संदीप आणि शीलाचे लग्न गडचिरोलीच्या जंगलात लावून दिले.लग्नानंतर मूल व्हावे, अशी संदीप आणि शीलाची इच्छा होती. मात्र नसबंदीसाठी त्यांच्यावर चळवळीतून दबाव येऊ लागला. यापूवीसुद्धा चळवळीतील अनेक युवक-युवतींची जबरीने नसबंदी करण्यात आली होती. मात्र आम्हाला मूल पाहिजे होते. अखेर लग्न लावून देणार्या पहाडसिंगनेच आम्हाला आत्मसर्मपणाचा सल्ला दिला, असे या नक्षल दाम्पत्याने सांगितले.चळवळीत युवतींना जबरदस्तीने सहभागी करून त्यांचे लैंगिक शोषण करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. तसेच जबरीने नसबंदी होत असल्यामुळे चळवळीतील युवक-युवतींमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच पोलिसांनी नसबंदी शस्त्रक्रिया रिओपन करण्याबाबत तयार केलेले पोस्टर आम्ही पाहिले. आत्मसर्मपित नक्षल दाम्पत्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात नसंबदी शस्त्रक्रिया पुन्हा खुली केली जाते व त्यांना अपत्याचा लाभ घेता येतो, ही गोष्ट ऐकली होती, असेही या दाम्पत्याने सांगितले. पहाडसिंगने आपल्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी आतापयर्ंत अनेक तरुण-तरुणांना या हिंसक चळवळीत ओढले. मात्र आपला अंगरक्षक संदीप आणि शीलाचे लग्न लावून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांपुढे आत्मसर्मपण करावे, असा सल्ला देणार्या पहाडसिंगने यापूर्वीसुध्दा आपल्या मुलींनी शिकून सवरून डॉक्टर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. (स्थानिक प्रतिनिधी)
अपत्य प्राप्तीसाठीच नक्षली दाम्पत्याचे आत्मसर्मपण
By admin | Published: June 08, 2014 12:50 AM