मुंबई- नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एमआरआय रुममध्ये तरुणाच्या झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-यांवर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण, महिला कर्मचारी सुनीता सुर्वे यांचं निलंबन करत त्यांच्यावर भादंवि 304 गुन्ह्यांतर्गत अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारानं मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देऊ केली आहे. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुणाच्या मृत्यूनंतर भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नायर रुग्णालयाचे डीन यांना धारेवर धरले असून, त्यांच्याच कार्यालयात बसून निषेध आंदोलन केलं होतं. अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव राजेश मारूची असून, आजारी असलेल्या आईला त्यानं एमआरआय चाचणीसाठी नेले असताना ही दुर्घटना घडली आहे. एमआरआय चाचणीसाठी आईला नेत असताना रूमबाहेर असलेल्या वॉर्डबॉयने राजेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ सुरक्षिततेच्या दृष्टीनं काढून ठेवण्यास सांगितले. परंतु त्याच वेळी वॉर्डबॉयनं रुग्णासाठीचा ऑक्सिजन सिलिंडर राजेशला आत नेण्यास सांगितलं.
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात नायर रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 5:00 PM