लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काही ठिकाणी विरोधात काम केले : अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 10:37 AM2019-06-15T10:37:37+5:302019-06-15T10:45:37+5:30
काही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी विरोधात प्रचार केल्याच्या तक्रारी आढावा बैठकीत उमेदवार यांनी केल्या असून, त्याबाबत जेव्हा राष्ट्रवादीसोबत राष्ट्रीय चर्चा होईल त्यावेळी ह्या विषयाबद्दल चर्चा केली जाईल, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत काही जागांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी विरोधात काम केल्याच्या सुरु कॉंग्रेसमध्ये पहायला मिळत आहे. कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत उमेदवारांनी याबाबत तक्रार केली असल्याचा खुलासा, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिकिया दिली.
एकीकडे भाजप- सेनामधील युती , जागा वाटपाच्या टप्यापर्यंत पहोचली आहे. दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये अजूनही, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची खापर एकमेकांच्या माथी फोडणे सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत काही जागांवर राष्ट्रवादीने आघाडी पाळली नसल्याचा आरोप आता कॉंग्रेसमधून केला जात आहे. विशेष म्हणजे याचा खुलासा खुद्द अशोक चव्हाण यांनी केला आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी विरोधात प्रचार केल्याच्या तक्रारी आढावा बैठकीत उमेदवार यांनी केल्या असून, त्याबाबत जेव्हा राष्ट्रवादीसोबत राष्ट्रीय चर्चा होईल त्यावेळी ह्या विषयाबद्दल चर्चा केली जाईल,असेही अशोक चव्हाण म्हणाले.
जिल्ह्यातील आणि राज्यस्तरीय नेत्यांचे मनोगत आयकून घेण्यात आले आहे. पुढील आगामी चर्चा राष्ट्रवादी आणि आघाडीसोबत येण्यास इच्छुक असलेल्या समविचारी पक्षांसोबत केली जाणार आहे. त्यांनतर जागावाटपाचे निर्णय घेण्यात येईल असेही, चव्हाण म्हणाले.