NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 05:13 PM2023-10-18T17:13:35+5:302023-10-18T17:15:38+5:30

NCP Ajit Pawar And Sharad Pawar Group: एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात एका मुद्द्यावर एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ncp ajit pawar and sharad pawar group decide to not contest five state assembly election | NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय!

NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय!

NCP Ajit Pawar And Sharad Pawar Group: आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार आणि शरद पवार गटात एका मुद्द्यावरून एकमत झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येअजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत असून, दुसरा विरोधात आहे. यातच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत दोन्ही गटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट अजित पवार गट आणि शरद पवार गट हे या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार नाहीत, निवडणूक चिन्हाबद्दलची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असताना दोन्ही गटांनी याबद्दलचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अजित पवार गटाच्या वर्किंग कमिटीची लवकरच दिल्लीत बैठक होणार असून, निवडणूक चिन्ह लढाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीची तारीख लवकरच निश्चित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


 

Web Title: ncp ajit pawar and sharad pawar group decide to not contest five state assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.