Ajit Pawar: नवा ट्विस्ट! राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट? ED आरोपपत्रात नाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:02 AM2023-04-12T11:02:28+5:302023-04-12T11:03:06+5:30

Ajit Pawar: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने एक आरोपपत्र दाखल केले आहे.

ncp ajit pawar and sunetra pawar name not include in ed filed chargesheet in maharashtra state cooperative bank scam | Ajit Pawar: नवा ट्विस्ट! राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट? ED आरोपपत्रात नाव नाही!

Ajit Pawar: नवा ट्विस्ट! राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट? ED आरोपपत्रात नाव नाही!

googlenewsNext

Ajit Pawar: आताच्या घडीला राज्याचे राजकारण अनेकविध मुद्द्यावरून तापलेले पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून या प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट दिली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने एक आरोपपत्र दाखल केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव नाही. २०२१ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास ६५ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नसून पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी  आरोपपत्र आणि अजित पवार यांच्याशी संबधित प्रश्नांवर उत्तर देण्याचे टाळले.

कर्ज देणाऱ्या बँकांवर अजित पवारांचे वर्चस्व

जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​बहुतांश शेअर्स स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत. स्पार्कलिंग सॉईल ही अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनी असल्याचे तपासात समोर आले. तसेच बँकेचा इतिहास तपासला जात असताना या कारखान्याच्या नावे नव्याने घेतलेले कर्ज हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. कारण ज्या बँकानी कर्ज दिले त्या बँकावर वर्चस्व हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे होते. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण नेमकं काय? 

महाराष्ट्र राज्य सहकारी  बँकेच्या  संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूत गिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. परंतु या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड नुकसान होऊन बँक अवसायानात गेली. यात सुमारे २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. ज्याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबादार आहे, असा आरोप करून या प्रकराची चौकशी करावी अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याची दखल घेत नाबार्ड तसेच मुंबई पोलिसांचा अहवाल पाहता प्रथम दर्शनी गुन्हा दाखल होऊन चौकशी होणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने सांगितले. तसे आदेश ऑगस्ट २०१९ मध्ये दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र तपासाअंती कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष नोंदवणारा सी समरी अहवाल पोलिसांनी सप्टेंबर २०२० मध्ये न्यायालयात सादर केला. तसेच हे प्रकरण बंद करण्याची विनंती केली होती. मुंबई पोलिसांच्या या 'सी समरी' अहवालाविरोध करत याचिका दाखल केल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ncp ajit pawar and sunetra pawar name not include in ed filed chargesheet in maharashtra state cooperative bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.