शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 4:57 PM

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: शरद पवार यांनी मंत्रीपदाचे संकेत दिल्यानंतर आता रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर काही ठिकाणी लागले असल्याचे सांगितले जात आहे.

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आणि ओबीसी समाजावरून आंदोलक नेते आक्रमक झालेले असताना, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला सशक्त पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. यातच आता शरद पवार यांनी रोहित पवार यांना मंत्री करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून अजित पवार गटातील नेत्यांनी पलटवार केला आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, पण रोहित पवार यांना मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. पहिल्याच मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंना मंत्रि‍पदाची संधी मिळाली. आता, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास रोहित पवार यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात येईल, असे संकेत खुद्द शरद पवार यांनी दिले. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात, रोहित पवार यांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आणि  पुढील पाच वर्षात ते महाराष्ट्राची सेवा करतील, त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यानंतर अनेक ठिकाणी रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर्स झळकले आहेत. यावरून आता प्रफुल्ल पटेल आणि अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

शरद पवार आमचे गुरु, आजही आदर कायम, पण...

आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असलो तरी शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर कायम आहे. मी त्यांना आपला गुरु मानतो आणि त्यानुसारच काम करतो. त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवार यांच्या मंत्रिबाबत बोलताना त्यांनी खोचक टोला लगावला. जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री बनतील. प्रत्येक नेते हे त्या क्षेत्रात जाऊन आपला नेता निवडून यावा यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. परंतु, त्यांची सत्ता येईल, तेव्हाच ते मंत्री करतील, असा खोचक टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.

दरम्यान, ज्यांना स्वत: घर सांभाळता आले नाही, ज्यांना स्वत:च्या परिवाराबाबत आदर नाही. ज्यांच्या मनात इतर समाजाबाबत द्वेष आहे, अशा रोहित पवार यांनी आधी आपला मतदारसंघ सांभाळावा. नंतर महाराष्ट्राची स्वप्न बघावी, शरद पवार यांनी जरी मंत्रीपदाचे संकेत दिले असले, तरी रोहित पवार यांची योग्यता आहे का, हे तपासणे आवश्यक आहे, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीPraful Patelप्रफुल्ल पटेलPraful Patelप्रफुल्ल पटेलprafull patelप्रफुल्ल पटेल