“शरद पवारांशी आजही बोलणे होते, अजूनही त्यांच्या संपर्कात”; अजितदादा गटातील नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 09:20 AM2023-09-04T09:20:10+5:302023-09-04T09:22:18+5:30

Sharad Pawar And Ajit Pawar Group: शरद पवार यांच्याबद्दल असलेला आदर आजही माझ्या मनामध्ये कायम आहे, असेही अजित पवार गटातील नेत्याने म्हटले आहे.

ncp ajit pawar group praful patel said even today i am contact with sharad pawar | “शरद पवारांशी आजही बोलणे होते, अजूनही त्यांच्या संपर्कात”; अजितदादा गटातील नेत्याचे विधान

“शरद पवारांशी आजही बोलणे होते, अजूनही त्यांच्या संपर्कात”; अजितदादा गटातील नेत्याचे विधान

googlenewsNext

Sharad Pawar And Ajit Pawar Group:अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे सांगितले जात आहे. यातच काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला असून, राज्यातील काही ठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. यातच शरद पवारांशी आजही बोलणे होते. त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचे मोठे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 

राष्ट्रवादी पक्षात फुट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्याच्या चर्चा वारंवार सुरू असतात. अजित पवार गटाकडून शरद पवारांची मनधरणी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. पण शरद पवार आपल्या मतावर ठाम आहेत. यातच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. 

शरद पवारांशी आजही बोलणे होते, अजूनही त्यांच्या संपर्कात

शरद पवार यांच्याशी माझे आजही बोलणे होते. मी त्यांच्या संपर्कात आहे. मागील वेळी अमरावतीला शरद पवार यांच्यासोबत आलो होतो. आता अजित पवारांसोबत आलो. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी येथे आलो आहे. अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्याबद्दल असलेला आदर आजही माझ्या मनामध्ये कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवारांनी मला १९७८ साली बोलवून घेतले. तेव्हापासून त्यांच्यासोबतच आहे. त्यांचे आणि माझे आजही घरगुती संबंध आहेत. माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणे होत असते, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईच्या तिसऱ्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगो ठरविण्यासाठी एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे लोगोचे लोकार्पण झाले नाही. यांचा समन्वयक ठरला नाही. शेवटी १३ लोकांची समिती करावी लागली.  दुसरीकडे, देशातील जनतेला विश्वास असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यामुळे जगात देशाचा सन्मान वाढला आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. 

 

Web Title: ncp ajit pawar group praful patel said even today i am contact with sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.