“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 08:04 PM2024-06-20T20:04:04+5:302024-06-20T20:05:58+5:30

NCP Ajit Pawar Group News: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटावर केला आहे.

ncp ajit pawar group umesh patil replied shiv sena shinde group ramdas kadam statement | “रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

NCP Ajit Pawar Group News: अजित पवार थोडे उशीरा आले असते, मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर ती ९ मंत्रि‍पदे आम्हाला मिळाली असती. अजितदादांबाबत प्रचंड आदर आहे. ते धाडसी व्यक्ती, प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत. पण अजितदादा आणखी लेट आले असते तर आमच्या शिवसेनेचा फायदा झाला असता, असे सांगत शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला असून, रामदास कदम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

रामदास कदम यांच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील तणाव वाढण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी रामदास कदम यांच्या विधानांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काही वक्तव्य केली आणि त्यानंतरही आक्षेपार्ह शब्द वापरले. महायुतीत चांगल्या पद्धतीने समन्वय राहिला पाहिजे. रामदास कदम हे बेजबाबदार पणे बोलत आहेत. रायगडमध्ये रामदास कदम यांचे योगदान काय? तुमचे तेवढे मूल्य आहे का? तुमच्या पात्रतेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ठेवले आहे. तुमची पात्रता असती, तर तुम्हाला मंत्री केले असते. आम्ही ऐकून घेणार नाही, या शब्दांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. 

मुख्यमंत्र्यांनी रामदास कदम यांना समज द्यावी

रामदास कदम यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी रामदास कदम यांना समज द्यावी. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरवले जात आहे. महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढणार. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहिला शपथ विधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता, असे पाटील यांनी स्पष्टपणे सुनावले.

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत टीका केली आहे. यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, रामदास कदमजी आपण जोरात बोललात. मागुन आलेले "अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं" माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp ajit pawar group umesh patil replied shiv sena shinde group ramdas kadam statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.