Ajit Pawar : शपथविधी पाहून निघताना अजितदादांचा टोमणा; म्हणाले, काही नावं टाळली असती तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:22 PM2022-08-09T12:22:55+5:302022-08-09T12:34:14+5:30

NCP Ajit Pawar And Cabinet Expansion : भाजपाच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

NCP Ajit Pawar reaction over Eknath Shinde And Devendra Fadnavis Cabinet Expansion | Ajit Pawar : शपथविधी पाहून निघताना अजितदादांचा टोमणा; म्हणाले, काही नावं टाळली असती तर....

Ajit Pawar : शपथविधी पाहून निघताना अजितदादांचा टोमणा; म्हणाले, काही नावं टाळली असती तर....

googlenewsNext

राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार आज सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

"काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं...." असं म्हटलं आहे. तसेच "उशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं, क्लिनचीट मिळाली नाही त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं" असं अजित पवारांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना अजितदादांनी यावेळी कोणाचंही नावं घेणं टाळलं आहे. 

"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" 

यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे, ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी एक ट्विट केलं आहे. 

"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" असं म्हटलं आहे. तसेच लडेंगे… .जितेंगे असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

Web Title: NCP Ajit Pawar reaction over Eknath Shinde And Devendra Fadnavis Cabinet Expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.