शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

'लोकशाहीत बहुमताला प्राधान्य; आज बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत'- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 9:49 PM

'लोकशाहीत बहुसंख्य लोक पक्ष चालवतात, आमच्यासोबत पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी आहेत.'

NCP Ajit Pawar Sharad Pawar ( Marathi News ) : निवडणूक आयोगाने शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. यामुळे अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. या निर्णयानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

निकील नम्रपणे स्वीकारतोकोणत्याही पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची पद्धत आहे. यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. आमचे म्हणणे मांडले, इतरांनीही त्यांचे म्हणणे मांडले. लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते, त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह घडाळ आणि झेंडा आम्हाला मिळाल्या. आमच्या सोबतच्या 50 आमदारांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. विधासभेत अध्यक्षांसमोरही सुनावणी झाली आहे. ते कधी निकाल देतील ते माहिती नाही. ते लवकरात लवकर निकाल देतील अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.

नवीन पिढीला बरोबर घेऊन...पक्ष पळवल्याचा आरोप विरोध करत आहेत, असा प्रश्न केला असता अजित पवार म्हणाले, पक्ष पळवण्यचा प्रश्नच कुठे येतो? कोण काय बोलतो, त्याचा आम्ही विचार करत नाही. मी कोणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. आयोगाने आमची बाजू खरी मानली. त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर कोर्टात गेलो असतो. आम्ही राज्याची कामे करण्यासाठी इथे आलो आहोत. नवीन पिढीला बरोबर घेऊन राज्यासाठी कामे करत राहू, असंही पवार म्हणाले. 

बहुमत आमच्याकडे आहेअजित पवार पुढे म्हणतात, 50 पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत, राज्यातील सर्वाधिक जिल्हाध्यक्ष आमच्याकडे आहेत, पदाधिकारी आमच्याकडे आहेत. आमची भूमिका त्यांना योग्य वाटली होती, त्यामुळेच ते सर्व आमच्या बाजूने आले. लोकशाहीत बहुसंख्य लोक पक्ष चालवतात, आमच्यासोबत पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी आहेत. आयोगाने जो निर्णय दिला, तो मान्य करावा लागतो. तुम्हाला निकाल मान्य नसेल, तर कोर्ट आहे. आम्हाला त्याचा उतमात करायचा नाही. विरोधकांना टीका करण्याशिवाय काही उरले नाही. येणाऱ्या काळात आमच्यासोबत येतील त्यांचे आम्ही स्वागत करू, बेरजेचे राजकारण करत राहू.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग