शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

"तमाशाला तुला घेऊन जातो"; शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 9:23 AM

साताऱ्यात एका कार्यक्रमात शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिली.

DCM Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच ओळखले जातात. कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना अनेकदा अजित पवार हे आपल्या खास शैलीत समज देताना दिसतात. अशाच एका अतिउत्साही कार्यकर्त्याला अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत समज दिली. अजित पवारांनी कार्यकर्त्याला दिलेल्या सल्ल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. अजित पवारांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेतल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा साताऱ्याच्या वाई मतदारसंघात दाखल झाली. महायुती सरकारच्या कामांची माहिती यावेळी अजित पवार यांनी सभेत दिली. तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देखील अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी अजित पवार यांच्या भाषणादरम्यान एक अतिउत्साही कार्यकर्ता वारंवार शिट्या वाजवत होता. त्यावेळी शिट्या वाजवणाऱ्या त्या कार्यकर्त्याला अजित पवार यांनी समज दिली.  तू सारखी शिट्टी वाजवत आहेस मी मगापासून बघितोय, आता पोलिसांच्या ताब्यात देईन, असा इशारा अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिला. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिलेल्या सल्ल्याने सर्वांनाच हसू फुटलं.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार हे कार्यक्रमात भाषण करत असताना एका कार्यकर्त्याने शिटी वाजवली. त्यानंतर अजित पवारांनी भाषण थांबवलं आणि कार्यकर्त्याला समज दिली. "तू सारखी शिट्टी वाजवतो. मी तुला मघापासून बघितलं आहे. आता पोलिसांच्या ताब्यात देईल. इथे माझ्या माय माऊली बसल्या आहेत. त्यांच्यासमोर शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती कशी आहे. आपण तमाशाला गेल्यावर शिट्टी वाजवायची, फेटा.... तेव्हा जाऊ. त्यावेळी तुला घेऊन जातो. तुझा अपमान करायचा नाही. तुझा उत्साह निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे, म्हणून जरा दमानं घे," अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्याची फिरकी घेतली.

"आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं काम करत आहोत. सरकारमध्ये नव्हतो त्या काळात आपल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, नंतरच्या काळात ती स्थगिती उठवण्यात आली.मायमाऊलींनी गुलाबी फेटे घातलेत मी देखील तसाच घातला आहे. मायमाऊलींना पैसे आले का विचारायचो, त्या समाधानानं आणि आनंदानं त्या प्रतिसाद देत होत्या. दादा पैसे आले असं सांगतात त्यावेळी आनंद वाटतो. खूरपणीला जाणाऱ्या बहिणीकडे कुणाचं लक्ष आहे असा विचार यायचा," असं अजित पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसर