शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
5
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
6
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
7
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
8
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
9
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
10
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
11
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
12
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
13
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
14
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
15
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
16
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
17
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
18
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
19
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका

फडणवीस नशीबवान; अडीच वर्षांत ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही झाले; ‘दादां’चा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 12:39 PM

यावेळी जे विधीमंडळात आमदार निवडून आले, त्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, पवार यांचं वक्तव्य.

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अभिनंदनपर भाषणादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांना मिश्किल टोला लगावला.

“मी अनेकदा देवेंद्र फडणवीसांना इथे भाषण करताना पाहिलं. पण आज तो उत्साह दिसत नव्हता. यावेळी जे विधीमंडळात आमदार निवडून आले, त्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. अडीच वर्ष झाली, अडीच वर्ष शिल्लक आहेत. अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमत्री पण झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. कोणतंही पद ठेवलं नाही. सर्व महत्त्वाची पदं ही त्यांनी भूषवली,” असं म्हणत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. 

काय म्हणाले फडणवीस?मविआचं सरकार आलं तेव्हाच मी सांगत होतो हे सरकार अनैसर्गिक आहे, हे टिकणार नाही. माझी खूप टिंगल टवाळी झाली.  मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. अनेकांनी टिंगल टवाळी केली. मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. माझा बदला एवढाच की मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है, असं फडणवीस म्हणाले.

मविआचं शतक हुकलंभाजपाच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव जिंकला आहे. शिंदें गट आणि भाजपाच्या सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले. तर महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ आज अजून घटल्याचे दिसून आले, महाविकास आघाडीच्या बाजूने विश्वासमत प्रस्तावाविरोधात केवळ ९९ आमदारांनी मतदान केलं. तर सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा