Ajit Pawar : "एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 12:53 PM2022-07-04T12:53:54+5:302022-07-04T13:02:44+5:30

NCP Ajit Pawar And Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं भाषण नेहमीप्रमाणे जोशपूर्ण दिसलं नाही असा टोला देखील अजित पवारांनी लगावला आहे.

NCP Ajit Pawar Slams Devendra Fadnavis Over Shivsena Eknath Shinde | Ajit Pawar : "एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?"

Ajit Pawar : "एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?"

googlenewsNext

मुंबई - विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शिंदेंच्या आजवरच्या प्रवासाची आठवण फडणवीस यांनी करुन दिली. तसेच "आम्हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू हे मोदींनी ठरवलं होतं. ते आम्ही करुन दाखवलं याचा अभिमान आहे. आमचे आमदार उभे राहिले तेव्हा विरोधीपक्षातून काहींनी ईडी, ईडी म्हणून आरडा ओरडा केला. पण मी त्यांना सांगू इच्छितो. होय हे ईडीचं सरकार आहे. ही ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र" असंही म्हटलं आहे. याच दरम्यान अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी देखील भाषण केलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांचं भाषण नेहमीप्रमाणे जोशपूर्ण दिसलं नाही असा टोला देखील अजित पवारांनी लगावला आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही झाले. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत ते वारंवार का सांगावं लागत आहे? असा सवाल देखील विचारला आहे. यासोबतच "एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?" अशी विचारणा देखील केली आहे. 

अजित पवार यांनी "देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी बारकाईने ऐकलं. तुम्ही एकनाथ शिंदेंचं इतकं समर्थन करत होता. मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात होते, तेव्हा फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं? नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे. ज्याचं वजन असतं, भारदस्त असतो त्याच्याकडे अधिक खाती असतात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अनेक खाती होती" असं म्हटलं आहे. 

"भाजपाने शिवसेनेसोबत राहून त्यांची ताकद वाढवली. प्रत्येक जण आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत असतो. आघाडी असली तरी एकनाथ शिंदे त्यांच्या गटाची ताकद वाढवण्यावर भर देतील, देवेंद्र फडणवीस त्यांचा पक्ष वाढवण्यावर भर देतील" असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: NCP Ajit Pawar Slams Devendra Fadnavis Over Shivsena Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.