शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Maharashtra Political Crisis: “१०६ हुतात्म्यांनी मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही, १०६ जण ती जावी म्हणून दिवस-रात्र झटतायत”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 11:39 AM

Maharashtra Political Crisis: मनाला पटतंय बघा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. हे नवे सरकार ज्या पद्धतीने स्थापन झाले आहे, त्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यातच आता पुन्हा एकदा मुंबई गुजरातला नेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. 

एका ट्विटमध्ये संयुक्त महाराष्ट्रावेळी हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मरण करत त्याचा संबंध आताच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यातून मुंबई गुजरातला नेण्यासंदर्भात भाजपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात, १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही! १०६ जण आता तीच मुंबई गुजरातला मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहे! असे म्हटले आहे.

मनाला पटतय बघा...

या ट्विटला अमोल मिटकरी यांनी, मनाला पटतंय बघा, असे कॅप्शनही दिले आहे. यापूर्वी अमोल मिटकरी यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून खोचक शब्दांत टीका केली होती. यामध्ये, कोरोनानंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून दीक्षांत समारंभाला आपण स्वतः हजर राहत आहात. विद्यापीठ सदस्य म्हणून आपणास भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करताना आनंद होत असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

आपण अनेकदा घटनाबाह्य वागलात

आपल्या देशातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य संविधानात आहेत. पी. सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. संविधान प्रेमी असाल, याबाबत मी तरी आशावाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्यच वागलात, असे मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत केलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबित यादी यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येत होती. तरीही आपण संविधानाचा सन्मान करत असाल, याबाबत मला शंका नाही, असे मिटकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण

आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात, हा प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा क्षण होता. छत्रपती शिवरायांचाच विचार भारतीय राज्यघटनेत आला आहे. तिचे पालन व संरक्षण आपण निश्चितच करावे, या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देताना आनंद होत आहे. आपणास नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस