Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत. मुंबईजवळील मीरा रोड येथे बागेश्वर बाबांचा दरबार भरला होता. याला लाखो भाविकांनी हजेरी लावली. यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी खरपूस शब्दांत समाचार घेत जोरदार निशाणा साधला.
गुढीची उभारण्याची माझी पद्धती वेगळी आहे. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. शेतकऱ्याचे अन्न नैवद्य म्हणून ठेवतो. गुढीला अभिवादन करतो. गुढी हा परंपरेनुसार साजरा होणारा सण आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज यांनी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट चालावी पंढरीची असा अभंग लिहिला. राम अयोध्येत आले तेव्हा त्यांनी भगवी पताका दाखवली होती. वारकरीही गुढी घेऊन जातो. त्यामुळे पताका फडकवणे हीच खरी गुढी आहे. माझ्या मनाला जे पटते, ते मी करतो. ताराराणीनंतर मनुवादी विचारसणीचे राज्य प्रस्तापित झाले. त्यावेळी गुढीची परंपरा बदलल्या गेली. सध्या वेगळी विचारधारा कार्य करत आहे, या शब्दांत अमोल मिटकरींनी सुनावले.
याहून महाराष्ट्राचे दुर्दैव काय?
बागेश्वर बाबाला लोक देव मानतात. नवनीत राणा यांचे भाषण बघा. त्यांनी सांगितले की, वो संत हैं. बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम यांचा अपमान केला. तरीही खासदार नवनीत राणा या बागेश्वर बाबा यांना संत म्हणतात. याहून महाराष्ट्राचे दुर्दैव काय असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला. मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. कुत्सित परंपरा पाळत नाही. गुढी पाडव्याला गुढी न उभारता, संभाजी महाराज यांना अभिवादन करतो, असे अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री किंवा महाराष्ट्रातील भाजप नेते दोन हजारांच्या नोटा कुठं गायब झाल्या. यावरुन विरोधकांनी तो सारा पैसा सरकारच्या निकटवर्तीय उद्योजकांकडे गेल्याचा आरोप केला होता. यावर, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्या राखून ठेवल्यात. कदाचित २ हजारांच्या नोटांची जबाबदारी किरीट सोमय्या यांच्याकडे असू शकते. नेमक्या ह्या नोटा गेल्या कुठे की भाजपने आपल्या सहकाऱ्यांकडे दिल्यात की मोहित कंबोज यांच्या घरी ठेवल्या आहेत. किरीट सोमय्या यांच्या घरी आहेत की टिल्लूच्या घरी आहेत याचा तपास शासकीय यंत्रणेने करावा, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"