शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
6
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
7
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
10
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
11
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
12
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
14
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
15
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
16
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
17
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
19
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
20
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार

कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 2:18 PM

Hasan Mushrif : कागलचा श्रावण बाळ म्हणून ओळख असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही कागल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

Maharashtra Elections 2024:  मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पहिली यादी जाहीर झाली आहे. ३८ उमेदवारांची पहिली यादी अजित पवार गटाने जाहीर केली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार आहेत. तर कागलचा श्रावण बाळ म्हणून ओळख असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही कागल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

गेली अनेक वर्ष कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या हसन मुश्रीफ यांना यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. मधल्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपकडून अनेक आरोप  झाले. तसेच, ईडीची चौकशी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि शरद पवारांसाठी डोळ्यात अश्रु आणणारे हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या गटात गेले. त्यामुळे कागलमध्ये महायुतीचे तिकीट त्यांनाच मिळणार, हे जवळपास निश्चित झाले होते. अजित पवार यांनीही कागलमध्ये झालेल्या सभेत हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता विधानसभेसाठी कागलमधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.  

दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांनी महायुतीत एन्ट्री केल्यानंतर भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी फुंकली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर मात केली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत समरजित घाटगे यांनी परिश्रम घेऊन मतदारसंघात मोर्चेबांधणी केली असली तरी भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी तुतारी फुंकली आहे. त्यामुळे कागलच्या राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या लढाईत कोण बाजी मारणार? याबद्दल उलट सुलट चर्चा रंगली आहे. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी

बारामती- अजित पवार

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

अमरावती- सुलभा खोडके

इंदापूर- दत्तात्रय भरणे

पिंपरी- अण्णा बनसोडे

पाथरी- निर्मला विटेकर

मावळ - सुनील शेळके

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

सिन्नर - माणिकराव कोकाटे

श्रीवर्धन - अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश सोळंखे

वाई - मकरंद पाटील

खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर - संग्राम जगताप

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

कळवण- नितीन पवार

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले- किरण लहामटे

वसमत – राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज अहिरे

चंदगड- राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर- राजू कारेमोरे

पुसद- इंद्रनील नाईक

नवापूर- भरत गावित

मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागल