छगन भुजबळ अजितदादांसोबत राहणार की भाजपामध्ये जाणार? NCP च्या नेत्याने सगळेच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:42 IST2024-12-27T15:41:14+5:302024-12-27T15:42:44+5:30

NCP Narhari Zirwal News: नाराज असलेले छगन भुजबळ आता काय निर्णय घेणार अजितदादांसोबतच राहणार की, फडणवीस भेटीनंतर भाजपा प्रवेशाचा विचार करणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ncp ap narhari zirwal reaction about chhagan bhujbal unrest | छगन भुजबळ अजितदादांसोबत राहणार की भाजपामध्ये जाणार? NCP च्या नेत्याने सगळेच सांगितले

छगन भुजबळ अजितदादांसोबत राहणार की भाजपामध्ये जाणार? NCP च्या नेत्याने सगळेच सांगितले

NCP Narhari Zirwal News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठकांवर भर देत आहेत. एकीकडे छगन भुजबळ सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट विधान केले आहे.

मंत्रिमंडळात भाजपाच्या वाट्याचे एक मंत्रीपद रिक्त आहे. नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रि‍पदासाठी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा असून, यासाठी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०८ ते १० दिवसांत पुन्हा भेटून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत स्वतः छगन भुजबळ यांनी माहिती दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. 

छगन भुजबळ अजितदादांसोबत राहणार की भाजपामध्ये जाणार?

छगन भुजबळ नाराज असताना मी त्यांना भेटलो, जी वागणूक मिळाली त्यामुळे ते नाराज आहेत, वागणूक चांगली दिली जात नाही असे ते म्हणाले. त्यावर मी त्यांना सांगितले की, तुम्ही सर्वांत मोठे आहेत, तुम्ही आमच्यासाठी वेगळा निर्णय घेऊ नका. राज्यसभा देऊ अशी चर्चा आहे, असे मी बोलोलो तर त्यांनी राग व्यक्त केला. आता समाजात वातावरण गढूळ झाले आहे. आता मला राज्यसभेवर पाठवत आहेत असे भुजबळ बोलले होते, अशी माहिती नरहरी झिरवाळ यांनी दिली. 

दरम्यान, छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


 

Web Title: ncp ap narhari zirwal reaction about chhagan bhujbal unrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.