“शरद पवार-अजितदादा एकत्र येऊ शकतात, विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते”; NCP नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 01:22 PM2024-07-20T13:22:02+5:302024-07-20T13:22:30+5:30

NCP Atul Benke News: विधानसभेच्या निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते, असे सूचक विधान अजित पवार गटातील नेत्याने केले आहे.

ncp atul benke claims that sharad pawar and ajit pawar can come together anything can happen before assembly | “शरद पवार-अजितदादा एकत्र येऊ शकतात, विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते”; NCP नेत्याचा दावा

“शरद पवार-अजितदादा एकत्र येऊ शकतात, विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते”; NCP नेत्याचा दावा

NCP Atul Benke News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. लोकसभेतील अपेक्षित कामगिरी न झाल्याने आता अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण आधीच्या म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एका नेत्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते. कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, असा मोठा दावा या नेत्याने केला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर अतुल बेनके यांच्या पक्षांतराविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर अतुल बेनके यांनी प्रतिक्रिया नोंदवताना सदर विधान केले आहे. 

कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही

शरद पवार जुन्नर तालुक्यात येत आहेत. एक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी तिथे गेलो होतो. यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. पवार कुटुंब आणि बेनके परिवाराचे ४० वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. दोन सिंचन प्रकल्प आणण्यासाठी यश प्राप्त केले आहे. माझी राजकीय भूमिका याआधी स्पष्ट केली आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहे, असे बेनके यांनी स्पष्ट केले.

विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते

लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांचे काम केले. राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर सुरु राहील. जुन्नराच्या हितासाठी काम करत राहणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते. महायुतीत जागावाटपावरुन काहीही होऊ शकते, कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान अतुल बेनके यांनी केले.
 

Web Title: ncp atul benke claims that sharad pawar and ajit pawar can come together anything can happen before assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.