NCP : अजित पवार आणि मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांवर राष्ट्रवादीची मोठी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:48 PM2023-07-18T16:48:17+5:302023-07-18T16:48:47+5:30

NCP Action on Ajit Pawar Supporters : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

NCP: Big action by NCP on Ajit Pawar and those who attended the swearing-in ceremony of ministers | NCP : अजित पवार आणि मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांवर राष्ट्रवादीची मोठी कारवाई 

NCP : अजित पवार आणि मंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांवर राष्ट्रवादीची मोठी कारवाई 

googlenewsNext

जुलै महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या शपथविधीस उपस्थित राहिलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी कांग्रेसकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आज कारवाई करण्यात आलेल्या  पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षाचे काही जिल्ह्यांमधील जिल्हाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ही कारवाई करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक पत्रक प्रसिद्ध केलं असून, त्यात म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी पुढील यादीनुसार विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. या सर्वांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून व संघटनेतील पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे.

कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं पुढील प्रमाणे आहे. 


Web Title: NCP: Big action by NCP on Ajit Pawar and those who attended the swearing-in ceremony of ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.