ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषद व ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदानाला सुरूवात झाली असून सरसंघचालक मोहन भागवत, सुशीलकुमार शिंजदे, विनोद तावडे, अजित पवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार कोणाला मतदान करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यांच कारण म्हणजे, मुंबईतील ज्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये पवार यांच्या नावाची नोंद आहे, त्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादीने उमेदवारच दिलेला नाही. त्यामुळे शरद पवार जेव्हा मतदानासाठी मतदान केंद्रावर जातील त्यावेळी कोणत्या पक्षाला मतदान करणार याबाबत चर्चा सुरू आहे.
वॉर्ड क्रमांक 214 मध्ये शिवसेनेचे अरविंद बने, भाजपाचे अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक रिंगणात आहेत.
Mumbai: Sharad Pawar casts his vote at polling booth no. 214(11) located in Mahalaxmi (West) #BMCelectionpic.twitter.com/iMWNnIdBdl— ANI (@ANI_news) February 21, 2017