शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी मांडले गणित; म्हणाले, “१६ आमदार अपात्र ठरले तरी…”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 3:34 PM

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात जाईलच याची काय खात्री आहे का, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केला आहे.

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राजकीय गणिते मांडण्याचा सिलसिला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राजकीय गणित मांडून अजितदादा कसे मुख्यमंत्री होऊ शकतात, ते सांगितले होते. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनी राजकीय गणित मांडले आहे. तसेच संजय राऊत यांच्या दाव्यावर वेगळीच शंका उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. 

येत्या १५ दिवसांत सरकार कोसळणार आहे. सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला होता.  येत्या काळात सर्वोच्च न्यायालायात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागल्यास सरकार बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सदर दावे केल्याचे बोलले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री बदलले जाणार अशी परिस्थिती नाही

संजय राऊत दिल्लीत काम करतात. ते संपादक आहेत. त्यांच्याकडे माहिती येत असते. परंतु, मुख्यमंत्री बदलाबाबत माझ्याकडे अशी माहिती नाही. मुख्यमंत्री बदलले जाणार अशी परिस्थिती नाही. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांची केस सुरू आहे, त्यांच्याविरोधात निकाल गेला तर त्यांची आमदारकी जाईल. त्यात एकनाथ शिंदेदेखील आहेत. ते गेले तर दुसरे मुख्यमंत्री येतील. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे का? आणखी काही निकाल येईल. त्यांच्या विरोधात निकाल आलाच, त्यांचे मुख्यमंत्री पद गेले तरी त्यांच्या सरकरला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे १४९ आमदार शिल्लक राहतात. त्यामुळे त्यांचे सरकार त्यांचंच राहील. केवळ मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती बदलू शकते, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा आहे. पण, इच्छा नेहमीच पुरेशी नसते, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. यावर बोलताना, आज आघाडी आहे. याचा अर्थ आघाडीत बिघाड होणार असल्याचा अर्थ घेऊ नका, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी