शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

Maharashtra Politics: “देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसतेय, भाजपला...”; शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 2:36 PM

Maharashtra Politics: आता चित्र बदलत असून, देशात बदलाचा सूर दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला केवळ चिंचवड राखता आले. गेल्या ३० वर्षांपासून भाजपकडे असलेला गड महाविकास आघाडीने जिंकला. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात अद्यापही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर भाष्य करताना भाजपवर निशाणा साधला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, कसब्यात धंगेकरांना दोन ठिकाणी जास्त मते मिळाली आहे. हा बदल पुण्यात होत आहे. याचाच अर्थ लोक वेगळा विचार करण्याच्या टप्प्यावर आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले तसेच निवडणूक आयोगाच्या संबंधीच्या ज्या शंका आमच्या सहकाऱ्यांनी उभ्या केल्या होत्या त्या निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत. पंतप्रधान आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेत्याचाही यात समावेश व्हावा. हा लोकशाहीमधील चांगला निर्णय आहे, असे मत शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसतेय

देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. पदवीधर निवडणुका जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली तर एकसुद्धा जागा मिळू शकली नाही. पुण्याच्या निवडणुकीबाबत काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे. देशात आता बदलाचा सूर दिसत आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये १२ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये दोन क्रमांकाची मते घेणारा पक्ष ठरला आहे. याबाबत शरद पवार यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती दिली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा