मुंबई: गेल्या दोन वर्षांत लोकांचं खूप प्रेम मिळालं. त्यामुळे मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच म्हटलं. फडणवीसांच्या Devendra Fadnavis या विधानावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेत टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेत्यांना ते आजही मुख्यमंत्री आहेत असं वाटतात. त्यांचं कौतुक वाटतं. त्यांचं मी अभिनंदन करतो, असा चिमटा शरद पवारांनी Sharad Pawar काढला.
फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण होत नाही. फडणवीसांना ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं. मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, असा टोला पवारांनी लगावला.
शरद पवारांनी सांगितला मावळचा हिशोबकाँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्याची आठवण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितली. विरोधी पक्षनेत्यांनी विषय काढलाच आहे म्हणून तिथली वस्तुस्थिती सांगतो, असं म्हणत पवारांनी मावळमधील घडामोडी सांगितल्या. मावळमधील शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. पोलिसांना गोळीबार करावा लागला. तिथली परिस्थिती बिघडवण्यामागे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा हात होता, असा दावा पवारांनी केला.
शरद पवारांनी यावेळी मावळमधील गेल्या अडीच दशकातील निवडणूक निकालांचं चित्रदेखील मांडलं. मावळमध्ये आधी जनसंघ आणि मग भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतर स्थानिकांमध्ये असंतोष असता, तर त्यांनी तो मतपेटीतून व्यक्त केला असता. पण तसं झालं नाही. भाजपनं चिथावणी दिल्याचं सत्य लोकांना समजलं. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत तिथे राष्ट्रवादीचे सुनिल शेळके तब्बल ९० हजार मतांनी विजयी झाले, याकडे पवारांनी लक्ष वेधलं.