"आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचंही कौतुक करत तो विश्वासाचा पक्ष असल्याचं म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील आठवण काढली."शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेला अनेक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. जेव्हा जनता पक्षाचं राज्य आलं आणि काँग्रेसचा पराभव झाला त्यावेळी काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी शिवसेना हाच पक्ष पुढे आला. त्यांनी इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकांमध्ये एकही उमेदवार उभा करणार नसल्याचा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो याचा तुन्ही विचार करा. पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची कधीही चिंता केली नाही. त्यांनी इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द निवडणुका न लढवता पाळता. कोणीही काही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं कालखंडात भक्कम पणाची भूमिका घेतील ती भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तरी तसं होणार नाही," असं शरद पवार म्हणाले. लोकसभा-विधानसभेत राज्याचं प्रतिनिधीत्व करेल"हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि कामही कररेल. हे सरकार नुसतं काम करणार नाही, तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रिक काम करून सामान्य जनतेचं देशात आणि राज्या प्रतिनिधीत्वही करेल यात शंका नाही," असं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज २२ वर्षे पूर्ण केली आहेत. राजकारणात सतत काम करत राहणं गरजेचं आहे. सत्ता महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता आवश्यक आहे. हे सरकार पाच वर्ष टिकणार आणि केवळ टिकणारच नाही लोकांसाठी कामही करणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण हे प्रश्न सोडवावेच लागतील. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित झाल्या. मात्र त्या योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना विश्वास असणारा पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 2:46 PM
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनादिवशी शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक; सरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवरही केलं भाष्य.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनादिवशी शरर पवारांकडून शिवसेनेचं कौतुकसरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास.