नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसच्या दिघा येथील तीन नगरसेवकांची सुनावणी १८ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे वर्धापनदिनानिमित्त पक्षाला अल्पसा दिलासा मिळाला आहे. दिघामधील नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते व दीपा गवते यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका आहे. त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याविषयीची सुनावणी आयुक्तांकडे सुरू आहे. शुक्रवारी सुनावणी होणार होती. परंतु गवते कुटुंंबीयांनी याविषयी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे यामुळे सुनावणीला मुदत वाढवून घेतली. यापुढील सुनावणी १८ जूनला होणार आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँगे्रसचा वर्धापनदिन असून त्याच दिवशी नगरसेवकांवर कारवाई होणार का याविषयीची चर्चा सुरू होती.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची १८ जूनला सुनावणी
By admin | Published: June 11, 2016 2:41 AM