“बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावा”; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:23 AM2023-07-03T10:23:12+5:302023-07-03T10:24:42+5:30

DCM Ajit Pawar News: अजित पवार यांच्या गोटात हलचालींनी वेग घेतला असून, बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

ncp dcm ajit pawar directs to workers to keep sharad pawar photo on party banner | “बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावा”; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

“बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावा”; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

googlenewsNext

DCM Ajit Pawar News: रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली. अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होताना, आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करत पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. 

अजित पवार यांनी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या निवडक आमदारांची बैठक बोलवली होती. जे सोबत येऊ शकतात, अशाच आमदारांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. तिथे सरकारला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली आणि पाठिंब्याचे पत्र तयार होऊन त्यावर उपस्थित आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या. ही बैठक सुरू होती तेव्हा सुप्रिया सुळे देवगिरीवर पोहोचल्या. अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र, यश येत नसल्याने नाराज सुप्रिया बाहेर पडल्या. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. 

बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावा

अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या गोटात हलचालींनी वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत सर्व समर्थक आमदार एकत्र येणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लावावा, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, आतापर्यंत अजित पवारांना समर्थन देताना ३५ आमदारांनी सह्या केल्याचे पत्र सादर केले असल्याची महिती समोर आली आहे. मात्र यानंतर आज एकूण ४२ आमदार अजित पवारांना पाठिंबा दर्शवतील अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या एकूण ५४ आमदार आहेत, यापैकी ४२ आमदार हे अजित पवार याना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ४२ आमदार हे अजित पवार यांच्या पाठिशी उभे राहिले तर हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: ncp dcm ajit pawar directs to workers to keep sharad pawar photo on party banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.