शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

“सुरक्षा व्यवस्थेचे अपयश, संसदच सुरक्षित नसेल तर मग इतरत्र काय?”; एकनाथ खडसेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 4:50 PM

Parliament Winter Session 2023: संसदेची सरक्षा व्यवस्था कशी कोलमडली आहे? याचे हे द्योतक आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

Parliament Winter Session 2023:संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. या दोघांनाही पकडण्यात यश आले असून, चौकशीदरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक्सवर एक पोस्ट करत या घटनेवर भाष्य केले आहे.

सन २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. या घटनेला २२ वर्ष झाली असून, यानिमित्ताने शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. याच दिवशी सुरक्षेत एवढी मोठी चूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नहीं चलेगी नहीं चलेगी.. तानाशाही नहीं चलेगी... अशी घोषणाबाजी करत संसद सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही युवकांनी आपला रोष व्यक्त केला. लोकसभा सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला खासदारांनी पकडले आणि चांगला चोप दिला. यानंतर त्याला सुरक्षा यंत्रणांकडे सोपवण्यात आले. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तरुणासह संसदेच्या परिसरातून एक महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. यावर आता एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. 

संसदच सुरक्षित नसेल तर मग इतरत्र काय?

संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असतांना आजच्याच दिवशी लोकसभेच्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सभागृहात उडी मारली. ही घटना संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा व्यवस्थेचे हे अपयश आहे. संसदेची सरक्षा व्यवस्था कशी कोलमडली आहे? याचे हे द्योतक आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी. जर संसदच सुरक्षित नसेल तर मग इतरत्र काय? अशी विचारणा एकनाथ खडसे यांनी केली आहे. 

दरम्यान, दोन्ही आरोपींनी कर्नाटकचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या संदर्भाने बनवलेल्या व्हिजिटर पासद्वारे संसदेत प्रवेश केल्याचे वृत्त आहे. संसदेच्या कामकाजादरम्यान घुसलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असे आहे. त्याच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. म्हणजे एकूण चार जण होते. ज्यांची चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदeknath khadseएकनाथ खडसे