शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

नगरमधील बंडखोर नगरसेवकांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी, आमदारांना मात्र अभय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 4:29 PM

महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या  १८ नगरसेवकांची  राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली

अहमदनगर - महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या  १८ नगरसेवकांची  राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. याशिवाय शहर जिल्हाध्यक्ष माणिक  विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. मात्र आमदार संग्राम जगताप यांना अभय मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा आदेश काढला आहे. अहमदनगर महापौर निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. शिवसेनेला सवार्धिक २४ जागा मिळवूनही महापौर पदापासून वंचित राहावे लागते. राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार अहमदनगर येथे आले असता पाठींबा देणारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. मात्र आमदार संग्राम जगताप यांच़्यावर कारवाई करण्यात आली नाही.

महापौर पदाच्या निवडणुकीसाठी जातीयवादी पक्षांना पाठींबा देऊ नये अथवा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान करू नये, असे स्पष्ट आदेश पक्षाने दिलेले होते. परंतु पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या  नगरसेवकांनी भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवारासा पाठींबा देऊन मतदान केलेले आहे. अशा प्रकारच्या पक्षविरोधी घडामोडी होत असताना याबाबतची माहिती अथवा कल्पनाही आपण पक्षश्रेष्ठींना दिलेली नव्हती. याबाबतचे स्पष्टीकरण ७ दिवसांत करावे म्हणून आपणास नोटीस पाठविण्यात आलेली होती. आपण याबाबत अद्यापपावेतो खुलासा न केल्यामुळे आपण पक्षशिस्त भंग केलेली आहे. म्हणून आपणास अध्यक्षपदावरून टाकण्यात येत आहे. बडतर्फ करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ही कारवाई  १८ नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यावर करण्यात आली आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून बडतर्फ केलेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सागर बोरूडे,  मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर, विनित पाउलबुद्धे,  सुनील त्रंबके,  समद खान, ज्योती गाडे,  शोभा बोरकर, कुमार वाकळे, रूपाली जोसेफ पारघे, अविनाश घुले, परवीन कुरेशी, शेख नजिर अहमद, प्रकाश भागानगरे, शीतल जगताप, गणेश भोसले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण