शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

चिखलीत राष्ट्रवादीला भाजपा वरचढ

By admin | Published: February 27, 2017 12:20 AM

चिखली-मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदारांनी भाजपाला अनपेक्षित यश मिळवून दिले

चिखली : चिखली-मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये मतदारांनी भाजपाला अनपेक्षित यश मिळवून दिले असून, राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. चिखली प्रभागात अ गटातील भाजपाचे कुंदन गायकवाड विजयी झाले असून, शिवसेनेचे नितीन रोकडे दुसऱ्या, तर राष्ट्रवादीपुरस्कृत सतीश दिघे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ब गटात भाजपच्या स्विनल म्हेत्रे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्वाती साने यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत स्विनल म्हेत्रे यांना विजय प्राप्त झाला. क गटात अपक्ष उमेदवार साधना मळेकर यांनी अनपेक्षितपणे सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या सोनम मोरे यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. याच गटात अलका मोरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ड गटात कार्यक्षम नगरसेवक दत्ता साने यांच्यावरच पुन्हा मतदारांनी विश्वास टाकला असून, शिवसेनेचे नेताजी काशीद यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, तर भाजपाचे पांडुरंग साने यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. प्रभाग क्रमांक १ मधून कुंदन गायकवाड, स्विनल मेहत्रे, साधना मळेकर या नवीन चेहऱ्यांना महापालिका सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांना मतदारांनी पुन्हा प्रभागात कार्यरत ठेवले आहे. भाजपाचे प्रचारप्रमुख किसन बावकर यांनी सांगितले, की प्रभागात विकासाचा मुद्दा जनतेसमोर मांडला व नवीन चेहऱ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दोन जागा मिळविल्या असून, अपक्ष उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले. (वार्ताहर)