पुणे : ग्रामीण मतदारांनी विश्वास दाखवत जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीच्याच हातात दिल्या. ७५ पैैकी ३८ हा बहुमतासाठी लागणारा आकडा पार करीत पुन्हा ४३ जागा पटकावीत जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष राष्ट्रवादी राहिला आहे. पुरंदर पंचायत समितीमध्ये मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला असून तिथे सत्ता गमवावी लागली आहे. शिवसेनेने तेथे भगवा फडकावला आहे. गेल्या वेळी बालेकिल्ल्यात काठावर पास होण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली होती. यंदा राज्यातील आणि केंद्रातील सत्तेच्या साथीने उतरलेला भारतीय जनता पक्ष, आक्रमक झालेली शिवसेना आणि कॉँग्रेसशी आघाडी करण्यात आलेले अपयश यामुळे सत्तेसाठी झगडण्याची वेळ राष्ट्रवादी कॉँग्रेसवर येईल असे वाटत होते, मात्र राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या आहेत. गेल्या निवडणुकीत १३ जागा घेऊन दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेने १४ जागा पुन्हा घेत आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. काँग्रेसला फटका बसला आहे. गेल्यावेळी ११ जागा होत्या. त्यांच्या चार जागा कमी झाल्या. ३ सदस्य संख्या असलेल्या भाजपाने आपली ताकद वाढवत सहा जागा घेतल्या आहेत. गेल्या निवडणुकीत एक जागा घेत पुरंदरच्या गडात मनसेचे रेल्वेइंजीन धावले होते. मात्र त्याचीही हवा गेली. आघाडी व अपक्षांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकी चार इतकीच आहे. (प्रतिनिधी)पुणेपक्षजागाभाजपा०६शिवसेना१४काँग्रेस०७राष्ट्रवादी४३इतर०४
सत्ता राष्ट्रवादीकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 4:23 AM