शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

"महाविकास आघाडी रंजल्या-गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार"; बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 10:13 AM

NCP Jayant Patil Letter To Dr Babasaheb Ambedkar : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केले आहे. महाविकास आघाडी रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार, कितीही हल्ले झाले तरी समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं रक्षण करणार असं त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. आंबेडकरी अनुयायांकडून सरकारने घातलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे. त्याच अनुषंगाने आंबेडकरी अनुयायांतर्फे #LetterToAmbedkar ही मोहीम राबवली जात आहे. ज्यात प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न जता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन केले जाणार आहे. स्वतः पत्र लिहत मंत्री जयंत पाटील यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला आहे. 

जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणतात...

"प्रिय बाबासाहेब,

देशभरातील कोविडचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देशहितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळतोय

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही काम करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं आम्ही रक्षण करू

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!!"

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना