शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:41 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पेट्रोल-डिझेल दररोज महाग होत आहे.  गेल्या 18 दिवसांपासून सतत इंधनाचे दर 50 ते 60 पैशांनी वाढत असून आज देशात कधीही न घडलेली गोष्ट घडली आहे. दिल्लीत पहिल्यांदाच डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त झाली आहे. इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

दररोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतींवरून जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनं  पोस्टर शेअर करत निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपने लावलेलं एक पोस्टर आव्हाड यांनी ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून "आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले. पेट्रोल 17 पैसे ते 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये" असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचा दर सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपाने पेट्रोल पंपांवर लावलेल्या एका बॅनरचा फोटोही ट्विट केलं आहे. 'ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती... विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं' असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी 'देशातील जनता सध्या कोरोनाचा सामना करण्यात गुंतली आहे. तसेच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाकडेही लोकांचं लक्ष आहे. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीकडे त्यांचं लक्ष जाणार नाही हे केंद्र सरकारला चांगलं माहीत आहे' असं म्हटलं होतं. 

देशभरात इतर ठिकाणी मात्र पेट्रोल डिझेलमध्ये कमालीचे अंतर आहे. महाराष्ट्रात हे अंतर 10 रुपयांचे आहे. दिल्लीने पेट्रोलवर कमी कर आकारत डिझेलवर जास्त कर लावला आहे. प्रदूषणामुळे डिझेलचा वापर कमी करावा हा त्यामागचा मूळ उद्देश असला तरीही महसूलही महत्वाचा असल्याने डिझेलवरील कर जास्त आहे. 2014 मध्ये इंधनाच्या किंमतींचे डिरेग्युलरायझेशन करण्यात आले आहे. यानुसार आता दिवसाला इंधनाच्या किंमती बदलल्या जातात. दिल्लीमध्ये पेट्रोलवर 64 टक्के आणि डिझेलवर 63 टक्के कर आकारला जातो. कर जवळपास समान असल्याने पेट्रोल आणि डिझेलमधील अंतर जवळपास समान झाले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या माजी DSP ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला

CoronaVirus News : कौतुकास्पद! मजुरांच्या मुलांना घेता यावे ऑनलाईन शिक्षण म्हणून 'त्यांनी' दान केले फोन

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकारFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक