Maharashtra Politics: समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या एका ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅग देत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषाबद्दल होणारी विधाने आणि वाद मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या व्यक्तव्याला जोडून एक वक्तव्य केले त्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटले. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या ट्विटमध्ये आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅगही जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.
दरम्यान, भाजपचे मनापासूनआभार मानतो. तुम्हांला धन्यवाद देतो.आमच्या यात्रेला प्रसिद्धी तुम्ही एका तासातच मिळवून दिलीत. 'आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा' ह्या पहिल्याच परिषदेवर तुम्ही इतकी टिका केलीत त्यामुळे ही यात्रा प्रत्येक घराघरात आता चर्चेचा विषय झाला आहे. बहुजनांचा इतिहास तुम्हांला का खुपतो? हेच आम्हांला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो, असा खोचक टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"